…जेव्हा नगरमध्ये निलेश लंके आणि खासदार विखे येतात आमने सामने! लंके यांच्या कार्यकर्त्यांनी काय केलं पहा…
आता हाच राजकीय वाद खासदार सुजय विखे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्यात पहायला मिळत आहे. सध्या या दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. याचदरम्यान हे दोन्ही नेते नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आमने सामने आल्याने वातावरण तंग झालं होतं.
अहमदनगर : येथे कधी काळी काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात राजकीय वाद पेटला होता. आता हाच राजकीय वाद खासदार सुजय विखे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्यात पहायला मिळत आहे. सध्या या दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. याचदरम्यान हे दोन्ही नेते नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आमने सामने आल्याने वातावरण तंग झालं होतं. त्यातच त्यांच्यासोबत त्यांचे त्यांचे कार्यकर्ते असल्याने राडाच होणार की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. दोनही नेते आणि नेत्यांचे कार्यकर्ते आमने सामने आल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात जोरदार घोषणाबाजी पहायला मिळाली. यावेळी खासदार विखे यांच्यासमोरच लंके समर्थकांनी भावी खासदार म्हणून लंके यांच्या नावाने जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात एकच वातावरण तापलं होतं.