Special Report | संतोष बांगर ’50 खोकेंच’ ग्रहण; जाईल तेथे मिळतो घोषणांचा प्रसाद, आता तर लग्न समारंभातही…
त्यासाठी 'पन्नास खोके, एकदम ओक्के'च्या घोषणा देखील दिल्या जातात. त्यामुळे या घोषणा आता अनेकांना डोकेदुखी ठरताना दिसत आहे. तर काही आमदारांना ती ग्रहणासारखी लागली आहे. याचाच प्रत्यक्ष शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्या बाबतीत आला आहे.
परभणी : शिवसेना फुटीपासून ते आता पर्यंत शिंदे यांचे आमदार किंवा खासदार दिसले की ठाकरे गटाच्या नेत्यांसह कार्यकरत्यांकडून विरोध होताना दिसत असतो. त्यासाठी ‘पन्नास खोके, एकदम ओक्के’च्या घोषणा देखील दिल्या जातात. त्यामुळे या घोषणा आता अनेकांना डोकेदुखी ठरताना दिसत आहे. तर काही आमदारांना ती ग्रहणासारखी लागली आहे. याचाच प्रत्यक्ष शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्या बाबतीत आला आहे. बांगर यांना आता पुन्हा एकदा एकदा 50 खोकेंवरुन टार्गेट करण्यात आलं आहे. बांगर हे लग्न समारंभासाठी परभणी येथे गेले होते. तिथेच त्यांच्यासमोर ठाकरेंचे खासदार बंडू जाधव आले. तेव्हा बांगर जाधवांसमोर नतमस्तकही झाले. मात्र त्याचवेळी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी लग्नसमारंभामध्येच बांगरांना डिवचलं आणि घोषणा सुरू केल्या. नेमकं काय घडलं, त्यावर हा स्पेशल रिपोर्ट
Published on: Jun 01, 2023 10:42 AM