‘मुख्यमंत्र्यांचा मान ठेवा’, जरांगे पाटलांनी ‘ती’ ऑफर धुडकावली आणि शिष्टमंडळ माघारी
मराठ्यांना कुणबीचं जात प्रमाणपत्र द्या. या मागणीसाठी मनोज जरांगे 8 दिवसांपासून उपोषणाला बसलेत. त्यांचे उपोषण सोडवण्यात दुसऱ्यांदा सरकारच्या शिष्टमंडळाला अपयश आलं. त्यातच आता अध्यादेश काढण्यासाठी 4 दिवसांचा अल्टिमेटम जरांगे पाटील यांनी दिला आहे.
जालना : 05 सप्टेंबर 2023 | मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या जरांगे पाटील यांनी सरकारला 4 दिवसांचा वेळ दिला आहे. गिरीश महाजन यांच्यासह सरकारचं शिष्टमंडळ दुसऱ्यांदा जरांगे पाटलांच्या मनधरणीसाठी पोहोचले. मात्र, मनोज जरांगे पाटील आपल्या मागणीवर ठाम आहेत. जरांगे पाटील आणि सरकारच्या शिष्टमंडळामध्ये एक तास चर्चा झाली. गिरीश महाजन यांनी मार्ग काढू म्हणत उपोषण सोडण्याची विनंती केली. मात्र, जीआर काढा तात्काळ उपोषण मागे घेतो असं जरांगे पाटील म्हणाले. मुख्यमंत्र्यांचा मान ठेवा असे म्हणत महाजन यांनी त्यांना मुंबईत बैठकीसाठी येण्याचं निमंत्रणं दिलं. अध्यादेश कोर्टात टिकलं पाहिजे अस सांगत तांत्रिक बाबी तपासणं सुरु असल्याचं महाजन म्हणाले. खोलीत चर्चा करु असंही सांगण्यात आलं. मात्र, जरांगे यांनी ते मान्य न करता गिरीश महाजन यांना संकटमोचक म्हटलं.
Published on: Sep 05, 2023 10:02 PM