उन्हाचा पारा चढलेला त्यात चंद्रकांत पाटील यांचे ‘ते’ विधान, रोहित पवार यांचा संताप का वाढला ?
पुण्याच्या वाढत्या उन्हात कसबा पेठ निवडणुकीत प्रचाराचा जोर वाढला आहे. महाविकास आघाडीच्या युवक नेत्यांची आज रॅली काढण्यात आली. या रॅलीत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे ही सहभागी झाले होते.
पुणे : पुण्याच्या वाढत्या उन्हात कसबा पेठ निवडणुकीत प्रचाराचा जोर वाढला आहे. महाविकास आघाडीच्या युवक नेत्यांची आज रॅली काढण्यात आली. या रॅलीत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे ही सहभागी झाले होते. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आजारी असतानाही अजून फिरत आहेत अशी टीका केली होती. त्याबद्दल विचारले असता रोहित पवार यांच्या संतापाचा पारा चढला. कोण म्हणलं ? कोण म्हणलं ? कोण चंद्रकांत पाटील ? शरद पवार यांना सल्ले देणारेव कोण आहेत ते ? चंद्रकांत पाटील यांना किती महत्व दयायचे असा संताप व्यक्त केला. पवार साहेब अजूनही मनाने आणि हृदयाने तरुण आहेत. त्यांच्यात क्षमता आहे. युवकांसारखे ते फिरतात ही त्यांची ताकद आहे. पण, लोकांनी भाजपाला नाकारायचे ठरवले आहे. त्यामुळेच काल एका मोठ्या नेत्याला आजारी असतानाही व्यासपीठावर आणण्यात आले. माणुसकी जपणे महत्वाचे आहे असा टोला त्यांनी भाजपला लगावला.