सनई-चौघड्यांचा आवाज, वऱ्हाडी, मुहूर्तावर अक्षतांचा पाऊस मात्र मंडपात नवरा नवरी नाही तर चक्क गाढवं; काय आहे हा प्रकार?

| Updated on: Jul 12, 2023 | 9:58 AM

अनेक भागत पाण्याची टंचाई भासत होती. अनेक भागात लोकांना पाण्यासाठी वणवण ही करावी लागली. आता कुठे पावसाने हजेरी लावली असली तरिही सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागात पाऊस नाही. पाउस नसल्याने शेतीची कामं देखील रखडली आहेत.

सोलापूर : गेल्या वर्षीच्या मानानं या वर्षी पावसाने जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात हजेरी लावली. त्यामुळे अनेक भागत पाण्याची टंचाई भासत होती. अनेक भागात लोकांना पाण्यासाठी वणवण ही करावी लागली. आता कुठे पावसाने हजेरी लावली असली तरिही सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागात पाऊस नाही. पाउस नसल्याने शेतीची कामं देखील रखडली आहेत. त्यामुळे अनवेकांची चिंता वाढली आहे. त्यामुळे वरूणराजाची कृपा व्हावी. तो आपल्या प्रसन्न व्हावा यासाठी अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी गावात चक्क लग्न लावण्यात आलं. सनई-चौघडा, वऱ्हाडी,‎ मुहूर्तावर अक्षता आणि मंडपही अशी लग्नाची जोरदार तयारी होती. मात्र मग्न मंडपात नवरा मुलगा नवरी मुलगी दिसत नव्हती तर ग्रामस्थांनी चक्क ‘गाढवाचं लगीन’ उरकलं. गाढवाचे लग्न‎ लावून ग्रामस्थांनी वरुणराजाची प्रार्थना करत पावसासाठी प्रार्थना केली. त्यावरून सध्या जोरदार चर्चा रंगत आहे.

Published on: Jul 12, 2023 09:58 AM
नितेश राणे यांच्या ‘त्या’ आरोपांवर चंद्रकांत खैरे यांचा उद्धव ठाकरे यांना सवाल; म्हणाले, “अजून शांत का आहात?”
“महाराष्ट्रभर फिरणं बंद कर, नाहीतर…”; रवी राणा यांना जीवे मारण्याची धमकी