PM NARENDRA MODI : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा असा आहे कार्यक्रम, राज्य सरकारने केली ‘ही’ विशेष घोषणा

| Updated on: Jan 19, 2023 | 11:56 AM

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM NARENDRA MODI ) यांच्या मुंबई दौऱ्यानिमित्त भाजप ( BJP ) आणि शिंदे गटाने ( SHINDE GROUP ) जोरदार तयारी केली आहे. भाजपने आगामी मुंबई महापालिका निवडणुकांवर ( MUMBAI MAHAPALIKA ) लक्ष केंद्रित केले असून आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मुंबईतील विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उदघाटन केले जाणार आहे. […]

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM NARENDRA MODI ) यांच्या मुंबई दौऱ्यानिमित्त भाजप ( BJP ) आणि शिंदे गटाने ( SHINDE GROUP ) जोरदार तयारी केली आहे. भाजपने आगामी मुंबई महापालिका निवडणुकांवर ( MUMBAI MAHAPALIKA ) लक्ष केंद्रित केले असून आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मुंबईतील विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उदघाटन केले जाणार आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या व्यासपीठावर भाजपने ‘निर्धार सरकारचा, कायापालट मुंबईचा’ हे स्लोगन लावले आहे. यातून भाजपने मुंबई मिशनची तयारी सुरु केल्याचे मानले जात आहे.

गुंदवली स्थानक येथे मेट्रो २ अ आणि ७ या मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते सायंकाळी ५ वाजता होईल. ५.२० वाजता २० व्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाचे उदघाटन, ५.३० वाजता मुंबईतील तीन हॉस्पिटलच्या पुर्नविकास योजनेचा शुभारंभ, ५.४५ वाजता मुंबईतील ४०० किमी रस्त्यांचे सिमेंटीकरण करण्याच्या योजनेचे भूमिपूजन आणि ६ वाजता CSMT च्या १८०० कोटींचा पुनर्विकास प्रकल्पाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे.

Published on: Jan 19, 2023 11:54 AM
पुणे टॉप न्यूज, फॅन्सी नंबर प्लेटवर मोठी कारवाई
लैंगिक शोषणाच्या आरोपावर बृजभूषण सिंह म्हणाले, कोणत्याही चौकशीसाठी तयार