नांदेडमध्ये शेतकऱ्यांची हरभरा काढणीसाठी लगबग
हवामान खात्याने अवकाळी पावसाचा (Rain) अंदाज वर्तवल्यानंतर नांदेडमध्ये शेतकऱ्यांची (Farmers) हरभरा काढणीसाठी लगीनघाई सुरू झालीय.
मुंबई : हवामान खात्याने अवकाळी पावसाचा (Rain) अंदाज वर्तवल्यानंतर नांदेडमध्ये शेतकऱ्यांची (Farmers) हरभरा काढणीसाठी लगीनघाई सुरू झालीय. यंदा नांदेडमध्ये (Nanded) रब्बी हंगामात हरभरा पिकाचे सर्वाधिक क्षेत्र आहे, आता हरभऱ्याच्या पिकाची पूर्ण क्षमतेने वाढ झालीय. तर कडक उन्हामुळे हरभरा हा वाळून गेलाय, अश्या स्थितीत हवामान खात्याने पुढच्या तीन दिवसात अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केलाय. या पावसात भिजून पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून बळीराजाचे अख्ख कुटुंब सध्या शेतात हरभरा कापणीच्या कामात व्यस्त असल्याचे दिसतंय.