नाशिक पदवीधरसाठी महाविकास आघाडीचं ठरलं, या अपक्ष उमेदवाराला दिला पाठिंबा

| Updated on: Jan 14, 2023 | 1:27 PM

अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे उमदेवार अर्जावरून महाविकास आघाडीने नाशिकची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.

नाशिक : विधान परिषदेतील कॉंग्रेस आमदार डॉ. सतीश तांबे ( SATISH TAMBE ) यांनी अचानक नाशिक पदवीधर मतदारसंघातून माघार घेतली. त्यांचे चिरंजीव सत्यजित तांबे ( SATYAJIT TAMBE ) हे या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवीत आहेत. ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, आता या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.

सत्यजीत तांबे यांना भाजपची फूस असल्याची चर्चा आहे. तर, खासदार संजय राऊत यांनी ही निवडणूक बिनविरोध होणार नाही असे सांगितले होते. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली.

दरम्यान, नाशिक पदवीधर निवडणुकीतील अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर लगेच शुभांगी पाटील यांनी मातोश्री गाठल्याने शिवसेना मोठा डाव टाकण्याच्या तयारीत असल्याचे हे संकेत मानले जात आहेत.

Thane : मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी बाईक रॅली
‘ठाकरे गटात फक्त तीनच लोकं राहतील’, नवनीत राणांचा दावा