VIDEO | गौतमी पाटीलला बोलवताय? बघा पुन्हा झाला कुठं गुन्हा दाखल? आता कारण काय?

| Updated on: May 24, 2023 | 9:55 AM

तिचे कार्यक्रम जोमात आणि जोरात होताना दिसत आहेत. गर्दीचे नवं नवे रेकॉर्ड ती करत आहे. तर तसेच रेकॉर्ड पोलिसांच्याकडेही तयार होत आहेत. गौतमी पाटीलमुळे थेट आयोजकावर गुन्हा दाखल होताना दिसत आहेत.

पुणे : प्रसिद्ध नृत्यांगना आणि महाराष्ट्रातील तरुण- तरुणींच्या गळ्यातील ताईत गौतमी पाटील बनली आहे. तिचे कार्यक्रम जोमात आणि जोरात होताना दिसत आहेत. गर्दीचे नवं नवे रेकॉर्ड ती करत आहे. तर तसेच रेकॉर्ड पोलिसांच्याकडेही तयार होत आहेत. गौतमी पाटीलमुळे थेट आयोजकावर गुन्हा दाखल होताना दिसत आहेत. आताही पिंपरी-चिंचवडमध्ये गौतमी पाटीलमुळे थेट आयोजकावर गुन्हा दाखल झाला आहे. गौतमी पाटीलचा सोमवारी जाहीर कार्यक्रम झाला. तिने काही गाण्यांवर नृत्य करत उपस्थितांची मने जिंकली. परंतु, बर्थडे बॉय तसेच आयोजक असलेले अमित शंकर लांडे यांच्यावर परवानगी नसताना गौतमी पाटीलच्या डान्सचा कार्यक्रम आयोजित केला म्हणून भोसरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Published on: May 24, 2023 09:55 AM
महापालिका निवडणुकीआधीच ठाकरे गटाला शिंदे यांचा दे धक्का? माजी नगरसेविकासह शाखाप्रमुखाला फोडलं
राज ठाकरे यांचं पवार साहेबांसारखं झालंय, भाजप नेत्यानं नेमकं काय म्हटलं?