Mahalakshmi : विदर्भात महालक्ष्मीच्या आगमनाची तयारी, 56 भोग केले जाणार
तीन दिवसपर्यंत पूजन केले जाते. या सणाला विदर्भामध्ये महालक्ष्मीची पूजा असं म्हणतात. त्याला फार मोठा महत्त्व असतं. महालक्ष्मीच्या मूर्ती बाजारात उपलब्ध आहेत.
नागपूर : गणपती बाप्पा विराजमान झाले. त्यानंतर धुमधाम सुरू होते ती महालक्ष्मीच्या आगमनाची. विदर्भात महालक्ष्मीच्या उत्सवाला मोठे महत्त्व आहे. घरोघरी महालक्ष्मीची स्थापना होते. तीन दिवसपर्यंत हा उत्सव सुरू असतो. पहिल्या दिवशी महालक्ष्मीसह कनिष्ठा आणि त्यांच्या दोन पुत्रांचा आगमन होते. पूजा पाठ करून विधिवत त्यांची स्थापना केली जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी महालक्ष्मीच्या विशेष नैवेद्याचे कार्यक्रम असतो. त्यामध्ये महालक्ष्मीला सोळा भाज्यांचा नैवेद्य दाखविण्यात येतो. त्याचप्रमाणे 56 भोग असतो. जेष्ठा आणि कनिष्ठा अशा दोन देवीच्या मूर्ती साकारल्या जातात. त्या आता बाजारात उपलब्ध आहेत. त्याच्या खरेदीसाठी धूमधाम सुरू आहे. तीन भागांमध्ये या मूर्ती विभागलेल्या असतात. खालचा भागाला पायली म्हणतात. मध्यंतरी शरीराचा भाग आणि वरती मुखवटा अशा प्रकारे महालक्ष्मीची मूर्ती तयार होते. त्यांचे तीन दिवसपर्यंत पूजन केले जाते. या सणाला विदर्भामध्ये महालक्ष्मीची पूजा असं म्हणतात. त्याला फार मोठा महत्त्व असतं. महालक्ष्मीच्या मूर्ती बाजारात उपलब्ध आहेत.