ठाकरे बंधूनी एकत्र यावेत यासाठी मनसे पदाधिकाऱ्यांची बॅनरबाजी वाढली; आता मुंबईबाहेर लागले बॅनर्स

| Updated on: Jul 05, 2023 | 12:26 PM

तर मनसे नेते वसंत मोरे यांनी सर राजकारण सोडावं असचं म्हटलं आहे. अशी परिस्थिती सध्या राज्यभर दिसत असताना, शिवसेना उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र यावं असं आवाहन मनसैनिकांकडून करण्यात येत आहे.

पुणे : राज्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार यांच्या बंडामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. इतकेच काय तर राजकारणात आता सामान्यांना रस राहिलाच नसल्याचे सोशल मीडियावर बोललं जात आहे. तर मनसे नेते वसंत मोरे यांनी सर राजकारण सोडावं असचं म्हटलं आहे. अशी परिस्थिती सध्या राज्यभर दिसत असताना, शिवसेना उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र यावं असं आवाहन मनसैनिकांकडून करण्यात येत आहे. दोन एक दिवसांपुर्वी दादर येथे त्यानंतर कल्याण तसेच ठाणे येथे ठाकरे बंधूनी आतातर एकत्र यावं अशा आशयाचे बॅनर लागले आहेत. त्यानंतर हिच मागणी आता पुण्यात देखील होताना दिसत आहे. येथे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूनी एकत्र यावे, पुणे शहरात मनसे पदाधिकाऱ्यांकडून बॅनर्सबाजी करण्यात आलीय. तर अखंड महाराष्ट्राच्या हितासाठी ठाकरे बंधूनी एकत्र यावं, राजसाहेब, उद्धवसाहेब हीच ती वेळ असे ही बॅनरवर लिहण्यात आलं आहे.

Published on: Jul 05, 2023 12:26 PM
खाते वाटपात महायुतीत तिढा, महसूल खातं अजित पवार यांच्याकडे जाणार? राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात…
अजित पवार यांच्या बंडानंतर इम्तियाज जलील यांचं जनतेला आवाहन, “आता तरी विचार करा…”