ललित पाटीलने ड्रग तस्करीत पैसे कमावले, या वस्तुत गुंतवले, पोलीस तपासात धक्कादायक माहिती
पुणे पोलिसांनी ड्रग माफिया ललित पाटील याचा भाऊ भूषण आणि त्याचा मित्र अभिषेक यांना ताब्यात घेतले आहे. या दोघांच्या चौकशीतून आणखी एक धक्कादायक गोस्त समोर आलीय. ललित पाटील याने एमडीतून (मेफेड्रोन) मिळवलेल्या पैशांबद्दलची ही माहिती आहे.
पुणे : 17 ऑक्टोबर 2023 | ड्रग माफिया ललित पाटील याने एमडीतून (मेफेड्रोन) मिळवलेल्या पैशांमधून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्याचा संशय पोलिसांना आला होता. पोलिसांचा हा संशय खरा ठरलाय. पुणे पोलिसांनी ललितचा भाऊ भूषण आणि त्याचा मित्र अभिषेक यांना अटक केली आहे. पोलिसांनी अभिषेककडून पोलिसांनी ३ किलो सोने जप्त केले होते. त्याआधारे पोलिसांनी या दोघांची अधिक चौकशी केली असता ही माहिती समोर आलीय. अभिषेक याने सोन्यात मोठी गुंतवणूक केली. त्यामुळे ललित पाटील यानेही सोन्यामध्ये गुंतवणूक केली असावी असा संशय पोलिसांना होता. पोलीस तपासात ललित पाटील याने ५ किलो सोने खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, ललित पाटील अजूनही पोलिसांच्या तावडीत सापडलेला नाही.
Published on: Oct 17, 2023 11:35 PM