सांगलीत 23 फूटी फायबर गणेशा ठरला सर्वांचे आकर्षण

| Updated on: Sep 11, 2024 | 4:01 PM

प्लास्टर ऑफ परिस या पदार्थापासून बनविलेल्या गणेश मूर्ती पाण्यात लवकर विरघळत नाहीत. त्यामुळे शाडूच्या गणेश मूर्त्यांना मोठी मागणी आहे. परंतू शाडूच्या मोठ्या आकाराच्या मूर्ती तयार करणे शक्य नाही. त्यामुळे सांगलीत एका मंडळाने चक्क फायबर गणेशा साकारला आहे.

सांगलीचे हे मंडळ इको फ्रेंडली  गणेश मूर्ती असून त्यांनी मिरवणूकीसाठी डॉल्बी देखील वापरलेला नाही. या वर्षीची सांगलीची ही फायबरची गणेशमूर्ती देशातील दुसऱ्या क्रमांकाची मूर्ती असून महाराष्ट्रातील पहिली फायबरची मूर्ती आहे. काही तरी वेगळे करायचे होते हा पहिल्यापासून प्रयत्न होता. यासाठी प्रथमच पासूनच मोठी मूर्ती बसविली होती. परंतू यंदाची मूर्ती फायबरची असून पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशी फायबरची मूर्ती बसविण्यात आली आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी तसेच प्लॅस्टर ऑफ पॅरिसमुळे होणारे तोटे टाळण्यासाठी ही मूर्ती तयार केलेली आहे. ही मूर्ती तयार करण्यासाठी सहा महिने लागले आहेत शहापुरातील राहुल झुंजारराव यांनी ही मूर्ती तयार केली असल्याचे श्रीमंत महागणपती मंडळाचे पदाधिकारी अभिजित कातरगी यांनी सांगितले.

Published on: Sep 11, 2024 03:56 PM