धक्कादायक! नर्सिंग स्टाफ बाजूलाच, तरिही इंजेक्शन टोचतोय सुरक्षा रक्षक; कुठं घडतयं नेमकं असं

| Updated on: Jun 17, 2023 | 4:46 PM

सरकारी रूग्णालयांचा ढिसाळ कारभार हा अनेकदा समोर आला आहे. ज्यामुळे अनेक रूग्णांचे आरोग्य धोक्यात येता येता वाचले आहेत. लातूर शहरातल्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णायात असाच धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

Follow us on

लातूर : राज्यातील अनेक भागात भोगस डॉक्टर आणि कंपाऊंडर यांचा भांडा फोड झाला आहे. तर अनेक सरकारी रूग्णालयांचा ढिसाळ कारभार हा अनेकदा समोर आला आहे. ज्यामुळे अनेक रूग्णांचे आरोग्य धोक्यात येता येता वाचले आहेत. लातूर शहरातल्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णायात असाच धक्कादायक प्रकार उघडकीस आला. येथे सुरक्षा रक्षकच डॉक्टर बनल्याचे चित्र पहायला मिळाले. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. तर हा व्हिडिओ रुग्णाच्या नातेवाईकांनीच व्हायरल केला. याबाबत मिळालेली माहिती अशी की, रेणापूर तालुक्यातल्या वाला गावचे शब्बीर शेख (वय -५४) हे अपघातात जखमी झाल्याने रुग्णालयात त्यांना भरती केले होते. त्यांच्यावर सुरुवातीला डॉक्टरांनी उपचार केले आणि ते निघून गेले. त्यानंतर जे काही नर्सिग स्टाफने इंजेक्शन्स द्यायचे होते, ते इंजेक्शन हा सुरक्षा रक्षकच देत होता. थांबलेल्या नातेवाईकांनी हा धक्कादायक प्रकार पाहिला आणि त्या एक्स्पर्ट सुरक्षा रक्षकाचं व्हिडिओ केला. यादरम्यान त्याबद्दल नर्सिंग स्टाफच तो एक्स्पर्ट असल्याचे सांगत होता. त्यामुळे रूग्णालयात सुरू असणाऱ्या या भोंगळ कारभाराचा पडदा फार्श करण्यासाठी तो व्हिडिओ व्हायरल केला. यानंतर आता या खासगी सुरक्षारक्षक राजेंद्र गायकवाड याला कामावरून काढून टाकण्यात आले आहे