पावसाळी अधिवेशनाआधी मुख्यमंत्री शिंदे यांची खाती इतर मंत्र्यांकडे; नेमकं असं काय होतयं?
राज्यात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना अधिवेशानात घेरण्याची तयारी केलेली असताना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडी असणाऱ्या खात्यांत बदल करण्यात आला आहे.
मुंबई, 17 जुलै 2023 | : राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी घटना घडल्यानंतर आता शिंदे-फडणवीस-पवार सरकारचे हे पहिलेच पावसाळी अधिवेशन आहे. यासाठी सरकारकडून विरोधकांना चहापाण्याच्या कार्यक्रमाचे आमंत्रण पाठविण्यात आलं होतं. मात्र त्यावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. राज्यात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना अधिवेशानात घेरण्याची तयारी केलेली असताना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडी असणाऱ्या खात्यांत बदल करण्यात आला आहे. त्यांच्याकडील अनेक खाती ही इतर मंत्र्यांकडे वर्ग करण्यात आली आहेत. त्यामुळे राज्यात नेमकं काय सुरूयं असाच सवाल सामान्य करताना दिसत आहेत. पण अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा होणारा विस्तार पुन्हा एकदा थांबल्याने शिंदे यांच्याकडे असलेली खाती इतर मंत्र्यांकडे वर्ग करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे ही सर्व खाती शिंदे गटाच्या आमदारांनाच देण्यात आली असून ते यासंदर्भात असणाऱ्या प्रश्नांना उत्तरे देतील. तर पहा कोणाकडं कोणतं खातं देण्यात आलं आहे.