Shinde Fadnavis Pune | पीएमपी ई-बसचं उद्धाटन, मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री उद्या पुण्यात

| Updated on: Sep 01, 2022 | 2:42 PM

Shinde Fadnavis Pune | पुणे महापालिकेच्या पुणे स्टेशन येथील ई-बस डेपोचे उद्या उद्धघाटन होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होत आहे.

Shinde Fadnavis Pune | पुणे महापालिकेच्या पुणे स्टेशन येथील ई-बस डेपोचे (E Bus Depo) उद्या उद्धघाटन होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे उपस्थित असतील. कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते अजित पवार यांना ही निमंत्रण देण्यात आले आहे. यावेळी 90 ई-बसेसचे लोकार्पण करण्यात येईल. केंद्रीय अवजड उद्योगमंत्री महेंद्रनाथ पांडे हे यावेळी उपस्थित असतील. पुणे स्टेशन ई-बस डेपोतून 15 विविध मार्गाचे नियोजन करण्यात आले आहे. त्या मार्गावर या बसेस धावतील. त्यामुळे चाकरमान्यांना आणि सर्वसामान्य पुणेकरांना सुविधा मिळणार आहे. तसेच ई-बसेसमुळे प्रदुषणाचा प्रश्न निर्माण होणार नाही. केंद्र सरकारने पुण्यासाठी 150 ई बसेसची भेट दिली आहे. त्यापैकी 90 बसेसचं उद्या लोकार्पण सोहळा होत आहे. आता या सोहळ्यात राजकीय फटकेबाजी काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Sep 01, 2022 02:42 PM
Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस यांनी केली मुख्यमंत्र्यांच्या घरी बाप्पांची आरती, आज ठाणे येथील घरी उपमुख्यमंत्री
Dharmapal Mesharam | अमोल मिटकरींवर कमिशनखोरीचा आरोप, धर्मपाल मेश्राम यांची चौकशीची मागणी