हातनूर धरणाच्या पाणीपातळीत वाढ; आठ जरवाजे उघडले
पावसामुळे हातनूर धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. पाणीपातळी वाढल्याने धरणाचे आठ दरवाजे उघडण्यात आले आहेत.
राज्यात सध्या सर्वदूर पाऊस सुरू आहे. जळगाव जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस झाला आहे. पावसामुळे हातनूर धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. पाणीपातळी वाढल्याने धरणाचे आठ दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने धरण परिसरातील तसेच तापी नदीच्या काठावरील गावांना सर्तकेचा इशारा देण्यात आला आहे.