Satara Rain | पावसामुळे कोयना धरणाच्या पाणी पातळीत वाढ, धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याची शक्यता

| Updated on: Jun 18, 2021 | 10:22 AM

दोन दिवस पडलेल्या संततधार पावसामुळे कोयना कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेले दिसत आहे. (heavy rains in Satara)

सातारा : साताऱ्यातील कराडमध्ये तुरळक पाऊस पडत असून पावसाची रिपरिप सुरु आहे. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरणही पाहायला मिळत आहे. दोन दिवस पडलेल्या संततधार पावसामुळे कोयना कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेले दिसत आहे. कोयना धरणातही पाण्याची आवक वाढली असल्याने कोयना धरणाच्या पायथा वीजग्रहातून 2100 कयुसेक पाणी सोडण्याची शक्यता धरण व्यवस्थापनाने व्यक्त केली आहे. (Increase in water level of Koyna Dam due to heavy rains in Satara)

तर सांगली जिल्ह्यात रात्रभरापासून तुफान पाऊस बरसत आहे. तर सकाळीही जोरदार पाऊस सुरु झाला आहे. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात 2 बंधारे, पलूस तालुक्यातील नागठाणे बंधारा आणि सांगलीतील सांगलीवाडी येथील बंधारा पाण्याखाली गेला आहे. सध्या कृष्णा नदीच्या पाणीची पातळीही जवळपास 23 च्या वर गेली आहे.

Mansukh Hiren Case | मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी आणखी दोनजण एनआयएच्या ताब्यात
Kolhapur Rain | कोल्हापुरात धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम, पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल