VIDEO : बैलगाडा शर्यतीत आयोजकांसह पाहणाऱ्यांच्या तोंडात आला जीव; असं काय झालं पहा…
मात्र यावेळी योग्य नियोजन नसल्यामुळे चालक व बैलाच्या जिवावर बेतल्याचे समोर आलं आहे. येथे एक बैलगाडा शर्यतीमध्ये एक अपघात झाला. ज्यात एक ज्येष्ठ गंभीर जखमी झाला आहे. तर चालक व बैलं सुखरूप बचावले आहेत.
इंदापूर : शहा येथे माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आमदार केसरी बैलगाडा शर्यतीत जोर पहायला मिळाला. मात्र यावेळी योग्य नियोजन नसल्यामुळे चालक व बैलाच्या जिवावर बेतल्याचे समोर आलं आहे. येथे एक बैलगाडा शर्यतीमध्ये एक अपघात झाला. ज्यात एक ज्येष्ठ गंभीर जखमी झाला आहे. तर चालक व बैलं सुखरूप बचावले आहेत. याबाबत माहिती अशी की, येथे नदी पात्रात लगतच वाढदिवसानिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात होते. ज्यात 250 पेक्षा अधिक बैलगाडा चालकांनी सहभाग घेतला. मात्र योग्य नियोजन नसल्याने बैलगाडा शर्यत चालू असताना एक बैलगाडा थेट नदी पात्रात घुसला. ज्यामुळे एकच धांजल उडाली. त्यावेळी आयोजकांसह प्रेक्षकांनी धाव घेत बैल गाड्यासह चालक बाहेत काढल्याने सुदैवाने जिवीत हानी नाही. तर सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला.
Published on: Jun 12, 2023 10:24 AM