Special Report | राऊतांमुळे राष्ट्रवादी नाराज अन् कॉंग्रेसची कोंडी?

| Updated on: Jun 13, 2022 | 9:40 PM

या घडामोडीमुळे खासदार संजय राऊत यांच्यावर भाजपकडून जोरदार हल्लाबोल करण्यात आला. घोडेबाजार झाली नसल्याचीच चर्चा यानंतर सुरु झाली.

राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आणि शिवसेनेचा एक उमेदवार पराभूत झाल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी अपक्ष आमदारांची नावं घेऊन घोडेबाजार झाल्याचा आरोप अपक्ष आमदारांवर केला. या अपक्ष आमदारांमध्ये आमदार देवेंद्र भुयार यांचंही नाव त्यांनी घेतलं होतं. त्यानंतर भुयारी संजय राऊत यांच्याविषयी नाराजी व्यक्त करत त्यांनी शरद पवार आणि अजित पवार यांची भेट घेऊन ही गोष्ट त्यांच्या कानावर घातली. त्यानंतर मात्र संजय राऊत यांनी याबाबत चर्चा झाली असून देवेंद्र भुयार यांच्याविषयी आपलं मत बदलले. या घडामोडीमुळे खासदार संजय राऊत यांच्यावर भाजपकडून जोरदार हल्लाबोल करण्यात आला. घोडेबाजार झाली नसल्याचीच चर्चा यानंतर सुरु झाली.

Published on: Jun 13, 2022 09:39 PM
Jitendra Awhad on Sharad Pawar | शरद पवार यांना राष्ट्रपती भवनात कोंडून घेण्यासारखं आहे-tv9
Rahul Gandhi यांची ईडीकडून उद्या पुन्हा चौकशी होणार