शिंदे यांची डोकेदुखी वाढली? अनेक इच्छुक; गोगावले यांच्यानंतर ‘या’ आमदाराने केला मंत्रीपदावर दावा

| Updated on: Jul 13, 2023 | 9:14 AM

तर दोन इंजनच्या सरकारमध्ये तिसरं राष्ट्रवादीचं इंजन जोडलं गेल्यानं अनेक इच्छुकांच्या आशेवर पाणी फेरलं गेलं आहे. यात अपक्ष आमदार आशिष जैस्वाल यांचाही समावेश आहे. यावरून जैस्वाल यांनी आपली प्रतिक्रिया सांगताना, सध्याचं होणार मंत्रिमंडळ विस्तार हे थोडसं अडचणीचं ठरलं आहे.

मुंबई : शिंदे-फडणवीस-पवार सरकराच्या तिसरा मंत्रिमंडळ विस्तार हा अडचणीत सापडला आहे. आमदारांच्या नाराजीमुळेच हा मंत्रिमंडळ विस्तार रखडलेल्याचे बोलले जात आहे. तर दोन इंजनच्या सरकारमध्ये तिसरं राष्ट्रवादीचं इंजन जोडलं गेल्यानं अनेक इच्छुकांच्या आशेवर पाणी फेरलं गेलं आहे. यात अपक्ष आमदार आशिष जैस्वाल यांचाही समावेश आहे. यावरून जैस्वाल यांनी आपली प्रतिक्रिया सांगताना, सध्याचं होणार मंत्रिमंडळ विस्तार हे थोडसं अडचणीचं ठरलं आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसही सोबत आल्यानं त्यांना वाटा द्यावा लागेल. त्यामुळे सगळ्यांनाच मंत्रीपद मिळतीलच असे नाही. तर आमदारांची गुणवत्ता पाहून मंत्रिमंडळात स्थान मिळायला हव अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर ज्यांनी सत्तासंघर्षात महत्वाचं योगदान सुरुवातीपासून दिलं त्यांना संधी मिळायलाच हवी अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे. याचबरोबर आपण सत्तासंघर्षापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर असल्याने मंत्रीपदावर क्लेम आहेच. त्यात काही वाद नाही असं म्हणत एकाप्रकारे यांनी संकेतच सरकारला दिले आहेत. तर येत्या मंत्रिमंडळात स्थान मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Published on: Jul 13, 2023 09:14 AM
मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटप ते अजित पवार दौरा; उदय सामंत म्हणतात, “गुड न्यूज मिळेल…”
मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब का? गुलाबराव पाटील यांनी स्पष्टचं सांगितलं, “3 पक्षाचा संसार…”