मंत्री नाही, पण मंत्रिपदाचा दर्जा; बच्चू कडू यांच्याकडे कोणती जबाबदारी ?

| Updated on: May 24, 2023 | 10:35 AM

शिंदे-फडणवीस सरकारनं मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा शब्द पाळला असे म्हटलं जात आहे. आमदार बच्चू कडू यांना शासनाकडून मंत्री पदाचा दर्जा जाहीर झाला आहे.

अमरावती : अपक्ष आमदार बच्चू कडू यांना मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले होते. मात्र त्यांनी याच्या आधी आपल्याला मंत्री पद मिळो ना मिळो आपण सामान्यांसाठी काम करत राहू असे सांगितलं होतं. त्यानंतर आज त्यांच्यावर शिंदे-फडणवीस सरकारनं मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा शब्द पाळला असे म्हटलं जात आहे. आमदार बच्चू कडू यांना शासनाकडून मंत्री पदाचा दर्जा जाहीर झाला आहे. कडू यांची दिव्यांग कल्याण विभागाच्या ‘दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालय दिव्यांगाच्या दारी’ या लोककल्याणमारी उपक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक व अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार शासनाने परिपत्रक काढून बच्चू कडू यांना मंत्री पदाचा दर्जा जाहीर केला. गेल्या 20 वर्षांपासून दिव्यांगांसाठी बच्चू कडू लढत आहेत.

Published on: May 24, 2023 10:35 AM
मालेगाव बाजार समितीत ‘हमाली’च्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट; शेंगा विक्रीची जागाही व्यापाऱ्यांनी लाटली
मंत्रिमंडळ विस्तारात पुणे जिल्ह्याला २ मंत्रिपद मिळणार? कुणाची नावं चर्चेत?