सोमय्या कथित अश्लील व्हिडिओ प्रकरण तापलं; आमदार रवी राणा यांनी थेट ठाकरे गटावरच बोट दाखवलं; घेतलं या माजी मंत्र्याचं नाव

| Updated on: Jul 18, 2023 | 4:26 PM

सोमय्या यांच्या कथित व्हिडिओ व्हायरल प्रकरणामुळे चांगलाच गाजला. तर मोठ्या प्रमाणावर आज यावरून वादंग झाला. सोमय्या यांच्या या व्हिडिओ प्रकरणामुळे ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला.

मुंबई, 18 जुलै 2023 | पावसाळी अधिवेशानाचा दुसरा दिवस हा भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या कथित व्हिडिओ व्हायरल प्रकरणामुळे चांगलाच गाजला. तर मोठ्या प्रमाणावर आज यावरून वादंग झाला. सोमय्या यांच्या या व्हिडिओ प्रकरणामुळे ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला. तर विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी चौकशीची मागणी लावून धरली. यावरून सध्या जोरदार चर्चा होत आहे. यावरून खासदार नवनीत राणा यांचे पती अपक्ष आमदार रवी राणा यांनी थेट ठाकरे गटाकडे बोट दाखवले आहे. तसेच आमदार राणा यांनी, सोमय्या यांचे हे व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ मागे माजी मंत्री आमदार अनिल परब असल्याचं म्हटलं आहे. याचबरोबर राणा यांनी यामागे अनिल परब असून ते तपासात समोर येईल असे देखील म्हटलं आहे.

Published on: Jul 18, 2023 04:26 PM
अश्लील व्हिडिओ व्हायरल प्रकरणावरून शिवसेना नेत्याची भाजपवर खरमरीत टीका, म्हणाला, ‘आता सोमय्या यांची…’
‘कितीही खोके, बोके करा, पण सरकार स्थिर’; शिवसेना नेत्याची विरोधकांवर खरमरीत टीका