अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांचा भाजपामध्ये प्रवेश; राजकीय घटनांना वेग
भाजपकडून अपक्ष आमदारांची जुळवाजुळव सुरु झाली आहे. अतिशय नाट्यमयरित्या घडत असलेल्या महाराष्ट्रातल्या राजकीय घटनांना वेग आला आहे. अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर आमदार अग्रवाल यांचा प्रवेश पार पडला. माजी मंत्री परिणय फुके यांच्या पुढाकाराने हा प्रवेश झाल्याची सूत्रांची माहिती आहे. येणाऱ्या काळात सत्ता स्थापनेसाठी भाजपाची रणनीती […]
भाजपकडून अपक्ष आमदारांची जुळवाजुळव सुरु झाली आहे. अतिशय नाट्यमयरित्या घडत असलेल्या महाराष्ट्रातल्या राजकीय घटनांना वेग आला आहे. अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर आमदार अग्रवाल यांचा प्रवेश पार पडला. माजी मंत्री परिणय फुके यांच्या पुढाकाराने हा प्रवेश झाल्याची सूत्रांची माहिती आहे. येणाऱ्या काळात सत्ता स्थापनेसाठी भाजपाची रणनीती सुरु झाली का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे अडचणीत सापडलेल्या शिवसेनेसमोर क्षणाक्षणाला आव्हानं वाढत आहे. एकनाथ शिंदे यांची बंडखोरी हा शिवसेनेचा अंतर्गत मुद्दा असल्याचे भाजपा सांगत आहे मात्र एकामागून एक घडत असलेल्या घटनांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
Published on: Jun 23, 2022 05:12 PM