पुण्यासह ‘या’ 2 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट? तुमचा जिल्हा यात आहे का?
दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उघडझाप सुरूच असून राधागनरी धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे गगनबावडा मार्गे कोल्हापुराचा कोकणाशी संपर्क तुटला आहे.
कोल्हापूर, 23 जुलै 2023 | भारतीय हवामान विभागाकडून पुन्हा एकदा राज्यातील काही जिल्ह्यांनी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आधीच भीतीच्या छायेखाली असणाऱ्या नागरिकांची आता पुर्ता तारांबळ उडालेली आहे. भारतीय हवामान विभागाकडून पुण्यासह रायगड, कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे पुण्यासह रायगड, कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच येत्या पाच दिवसात राज्यातील अनेक ठिकाणी जिल्ह्यांना देखील पाऊस झोडून काढण्याची शक्यता आहे. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उघडझाप सुरूच असून राधागनरी धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे गगनबावडा मार्गे कोल्हापुराचा कोकणाशी संपर्क तुटला आहे. तर पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्याची पातळी 37 फुटांवर पोहोचली असून जिल्ह्यातील 75 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर कोल्हापूर जिल्ह्याला आज पासून पुढचे तीन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.