बार्ज पी 305 जहाज बुडताना कर्मचाऱ्यांच्या समुद्रात उड्या, वाचलेल्या कर्मचाऱ्यांनी काय म्हटलं?
भारतीय नौदलानं आमचा जीव वाचवला. पूर्ण रात्र पाण्यात काढली, अशी माहिती बार्जवरील कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे.
मुंबई: कठिण काळात चार ते पाच जणांनी एकमेकांना धीर दिला. बार्ज पी 305 या जहाजावर अडिचशे ते तीनशे लोक बार्जवर होते. या संकटामध्ये चक्रीवादळामुळे बार्जचं नुकसान झालं. वाऱ्यानं बार्ज आदळलं त्यामध्ये पाणी भरलं. त्यानंतर पाणी भरल्यानं लाईफ जॅकेट घालून समुद्रात उड्या मारल्या. भारतीय नौदलानं आमचा जीव वाचवला. पूर्ण रात्र पाण्यात काढली, अशी माहिती बार्जवरील कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे.