indorikar maharaj | इंदोरीकर महाराजांचे 30 मे पर्यतचे सर्व कार्यक्रम रद्द
इंदोरीकर महाराजांचे 23 ते 30 मे पर्यंतचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे डाॅक्टरांनी हा सल्ला इंदोरीकरांना दिला आहे. हभप निवृती महाराज देशमुख यांचे अनेक ठिकाणी किर्तनाचे कार्यक्रम नियोजित होते. मात्र आता आयोजकांची गैरसोय होणार असल्याने इंदोरीकर महाराजांनी दिलगीरीही व्यक्त केली आहे.
indorikar maharaj : आपल्या महाराष्ट्राला किर्तनकारांची (Kirtan) एक मोठी परंपरा आहे. महाराष्ट्राने अनेक बडे किर्तनकार पाहिल आहे. निवृत्ती महाराज इंदोरीकर हेही त्यापैकीत एक किर्तनकार आहेत अलिकडच्या काळात किर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर (Indorikar Maharaj) प्रचंड गाजले. इंदोरीकर महाराजांची लोकप्रियता पाहून अनेकजण आवाक राहतात. इंदोरीकर महाराजांना ऐकायला अजूनही मोठी गर्दी जमते. इंदोरीकरांच्या भाषणातला तो विनोदी (Comedy) बाज आणि ग्रामीण हटके स्टाईल बोलणं अनेकांना भावतं. त्यामुळे त्यांच्या किर्तनच्या तारखा अनेकांना मिळता मिळत नाहीत, तसेच इंदोरीकरांच्या किर्तनाच्या तारखा महिनेच्या महिने पुढे बूक असातात. मात्र आज इंदोकरांच्या चाहत्यांना निराश करणारी तसेच चिंता वाढवणारी एक बातमी आली आहे. कारण तब्येतीच्या कारणास्तवर इंदोरीकर महाराजांनी काही दिवस ब्रेक घेतला आहे, अशी माहिती समोर आली आहे.