पंतप्रधान फंडातून 2 लाखांची मदत
अपघातात ठार झालेल्यांसाठी पंतप्रधान कार्यालयाकडून 2 लाखांची मदत जाहीर करण्यात आली असून नदीतील मृतदेहांचा शोध चालू ठेवण्यात आला आहे.
इंदूर-अमळनेर बसचा मध्य प्रदेशमधी खलघाटमध्ये नदीच्या पुलावरुन नव्वद फूट खाली बस कोसळून चाळीस प्रवासी ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे. नव्वद फूट खाली बस कोसळल्याने त्यातील कोणी प्रवासी वाचले असतील का याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत नाही. बसचा अपघात झाल्यानंतर मदतकार्य पोहचल्यानंतर 13 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले मात्र इतर प्रवाशांचे मृतदेह सापडले नसल्याचे मदतकार्य करणाऱ्या टीमकडून सांगण्यात आले. या अपघातात ठार झालेल्यांसाठी पंतप्रधान कार्यालयाकडून 2 लाखांची मदत जाहीर करण्यात आली असून नदीतील मृतदेहांचा शोध चालू ठेवण्यात आला आहे.
Published on: Jul 18, 2022 08:53 PM