उद्योगपती गौतम अदानी यांनी घेतली शरद पवार यांची भेट, कारण गुलदस्त्यात

| Updated on: Dec 29, 2023 | 9:17 PM

प्रख्यात उद्योगपती गौतम अदानी यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची काल रात्री अचानक भेट घेतली आहे. या वेळी दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली असून या चर्चेचा तपशील बाहेर आलेला नाही. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी धारावी अदानी प्रकल्पा विरोधात अलिकडे मोर्चा काढला होता. तेव्हा राष्ट्रवादीने मोर्चातून अंग काढीत शांत बसणे पसंत केले होते.

मुंबई | 29 डिसेंबर 2023 : प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी जाऊन रात्री अचानक भेट घेतली आहे. या दोघांमध्ये बंद दाराआड सुमारे अर्धा तास चर्चा झाली असून या भेटी मागचे कारण गुलदस्त्यात आहे. उद्योगपती गौतम अदानी शरद पवार यांचे मित्र असून याआधी त्यांनी पवार यांची अनेक प्रसंगी भेट घेतली आहे. या भेटी दरम्यान शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या. धारावी प्रकल्पात सहभागी असणाऱ्या गौतम अदानी यांच्या कंपनीच्या विरोधात महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाने मोर्चा काढून निदर्शने केली होती. त्यावेळी राष्ट्रवादी पक्षाने या मोर्चापासून अलगद आपले अंग काढले होते. आता अचानक गौतम अदानी अचानक शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Published on: Dec 29, 2023 12:29 PM
गुणरत्न सदावर्ते यांना सरकारचा वरदहस्त, अडसूळांचा घरचा आहेर
राम मंदिर उद्घाटन हा भाजपाचा पक्षीय कार्यक्रम, संजय राऊत यांची टीका