अजित पवार यांना स्टॅम्प पेपरवरून शिंदे यांच्या शिवसेना नेत्याचा खोचक सल्ला; म्हणाले, ”सध्या….”,
विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काल वक्तव्य केलं होतं. त्यांनी युतीमधील एकजूट कायम आहे. प्रत्येकाला आपले विचार आणि मत मांडण्याचा अधिकार आहे.
मुंबई : ही युती 2024 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत टिकेल की नाही हे सांगता येणार नाही असे शरद पवार यांनी म्हटलं होतं. तर भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेना नेत्यांकडून काही दिवसांपासून महाविकास आघाडीबाबत बिघाड होईल असे वारंवार म्हटलं जात आहे. त्यावरून विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काल वक्तव्य केलं होतं. त्यांनी युतीमधील एकजूट कायम आहे. प्रत्येकाला आपले विचार आणि मत मांडण्याचा अधिकार आहे. महाविकास आघाडीत सर्वोच्च पातळीवर होणारा निर्णय अंतिम असेल. तर आम्ही एकत्र निवडणूक लढवू, मी स्टॅम्प पेपरवर लिहू शकतो, असेही ते म्हणाले होते. त्यावरून आता उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अजित पवार यांच्यावर खोटक टीका केली आहे. तसेच खोचक सल्ला देताना, किती रूपयांचा स्टॅम्प पेपर देता? असा सवाल केला आहे. तर आता स्टॅम्प पेपरवर काही चालत नाही. तुम्ही नोटरी करा असा सल्ला दिला आहे. तर गेल्या काही दिवसांपासून यांच्या मविआतच ए,बी,सीडी असा खेळ सुरू आहे. फर्स्ट, सेकंड आणि तर्ड कोण असं पृथ्वीराज चव्हाण सांगत आहेत. आम्ही काही सांगायची गरज नाही असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.