मोठी बातमी : खासदार संजय राऊत यांच्याविरोधात विधानसभेत हक्कभंग आणणार?; सत्ताधारी विरोधकांचं ‘या’ मुद्द्यावर एकमत
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने संसदीय पक्षाच्या नेतेपदावरुन संजय राऊत यांची उचलबांगडी केली. त्यांच्या जागी खासदार गजानन किर्तीकर यांची नियुक्ती केली. त्यापाठोपाठ आता संजय राऊत यांना आणखी एक धक्का देण्याची तयारी शिवसेनेने केली आहे.
मुंबई : “एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही बनावट शिवसेना आहे. ते ड्युप्लिकेट चोरमंडळ आहे. विधीमंडळ नाही. हे चोरमंडळ आहे”, असं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी काहीवेळाआधी केलं. त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद विधिमंडळ अधिवेशनातही पाहायला मिळाले. त्यांच्या या वक्तव्याची दखल घेत सत्ताधारी पक्षाने आक्षेप घेतला. भाजप आमदार आशिष शेलार यांनी संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणण्याची मागणी केली. त्याला सत्ताधारी आणि विरोधकांनीही सहमती दर्शवली. या विधानाची चौकशी करून मग त्यावर कारवाई व्हावी, असं अजित पवार म्हणाले. तर बाळासाहेब थोरात यांनीही आशिष शेलार यांच्या वक्तव्याला सहमती दर्शवली.
Published on: Mar 01, 2023 11:37 AM