International Day of Yoga | आंतरराष्ट्रीय योग दिवस, पंतप्रधान नरेंद्र मोदी LIVE
कोरोनामुळे यंदा कोणताही सार्वजनिक कार्यक्रम होणार नाही. पंतप्रधान मोदी आणि इतर नेत्यांनी संवाद साधल्यानंतर योगा केला जाणार आहे. लोकांनी घरीच राहून व्हर्च्युअल पद्धतीने कार्यक्रमात भाग घ्यावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.
आंतरराष्ट्रीय योग दिवस, पंतप्रधान नरेंद्र मोदी LIVE. कोरोना प्रोटोकॉल लक्षात घेऊन एका कार्यक्रम स्थळी केवळ 20 लोकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल उद्या सकाळी 7 वाजल्यापासून ते 7.45 पर्यंत मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह लाल किल्ला परिसरात योग करणार आहेत. कोरोनामुळे यंदा कोणताही सार्वजनिक कार्यक्रम होणार नाही. पंतप्रधान मोदी आणि इतर नेत्यांनी संवाद साधल्यानंतर योगा केला जाणार आहे. लोकांनी घरीच राहून व्हर्च्युअल पद्धतीने कार्यक्रमात भाग घ्यावा, असं आवाहन करण्यात आलं आहे. योगा झाल्यानंतर आध्यात्मिक आणि योग गुरुही जनतेशी संवाद साधणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.