Jalna : जालन्यात अजून 30 लॉकर उघडण्यासाठी तपास सुरू, नोटांची भिंत, हिरे-मोती आणि कुबेराचा खजिना
तीस व्यावसायिकांचे लॉकर उघडण्यासाठीचा तपास सुरू आहे. जालन्यातील छाप्यानंतर इतर स्टील व्यावसायिकांवर त्याचा परिणाम दिसतोय.
जालन्यात काल पडलेल्या छाप्यानंतर आणखी 30 उद्योजकांकडील लॉकर उघडली जाण्याची शक्यता आहे. या लॉकर्समध्ये काही रक्कम सापडली तर हा देशातला सर्वात मोठा छापा ठरण्याची शक्यता आहे. जालना एमआयडीसीत दोनशे ते अडीचशे ट्रक रस्त्यावरच थांबले. भिंत उभी राहिलं, इतकी पाचशे रुपयांच्या नोटांची बंडलं. नोटा मोजण्यासाठी बारा मशिन्स, कोट्यवधींचं सोनं आणि हिऱ्या मोत्यांनी भरलेला कुबेराचा खजिना. जालन्यातल्या छाप्यातील रक्कम बाहेर आल्यानंतर सामान्यांचे डोळेही पांढरे झाले. याचा परिणाम म्हणजे जालन्यात येणारे दोनशे ते अडीचशे ट्रक जागेवरच उभे राहिलेत. शिवाय इतर तीन व्यावसायिकांचे लॉकर उघडण्यासाठीचा तपास सुरू आहे. जालन्यातील छाप्यानंतर इतर स्टील व्यावसायिकांवर त्याचा परिणाम दिसतोय.
Published on: Aug 12, 2022 11:45 PM