Atul Kulkarni | IPS अतुल कुलकर्णीची NIA मध्ये नियुक्ती
सध्या NIA कडून डी गँगशी संबंधित प्रकरणांचा तपास सुरू आहे. अतुल कुलकर्णी यांनी महाराष्ट्र राज्य एटीएस प्रमुख म्हणून काही काळ काम केलंय, शिवाय ते राज्याच्या सीआयडी विभागाचेही प्रमुख राहिलेले आहेत. त्यामुळे अतुल कुलकर्णी यांची ही नियुक्ती महत्वाची मानली जातेय.
मुंबई : आयपीएस अतुल कुलकर्णी यांची NIA मध्ये नियुक्त करण्यात आली आहे. अतुल कुलकर्णी यांची NIA मध्ये अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अतुल कुलकर्णी हे राज्याचे कारागृह विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक होते. त्यांची आता NIA मध्ये नियुक्ती करण्यात आलीय. सध्या NIA कडून डी गँगशी संबंधित प्रकरणांचा तपास सुरू आहे. अतुल कुलकर्णी यांनी महाराष्ट्र राज्य एटीएस प्रमुख म्हणून काही काळ काम केलंय, शिवाय ते राज्याच्या सीआयडी विभागाचेही प्रमुख राहिलेले आहेत. त्यामुळे अतुल कुलकर्णी यांची ही नियुक्ती महत्वाची मानली जातेय.
Published on: May 12, 2022 10:23 PM