Devendra Fadnavis | ‘जिथे गडबड आहे, अशी कोणतीही चौकशी बंद होणार नाही’-tv9

| Updated on: Sep 17, 2022 | 6:02 PM

यावेळी पत्रकारांनी फडणवीस यांना अजित पवार यांची सिंचन घोटाळ्याप्रकरणी चौकशी बंद होणार का असा प्रश्न विचारला होता. त्यावर त्यांनी जिथे गडबड आहे, अशी कोणतीही चौकशी बंद होणार नाही असे म्हटलं आहे.

सिंचन घोटाळ्याप्रकरणी राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांची चौकशी बंद होणार नाही की नाही यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुगली टाकली आहे. तसेच त्यांनी यावेळी जिथे गडबड आहे, अशी कोणतीही चौकशी बंद होणार नाही असे म्हटले आहे. यावेळी पत्रकारांनी फडणवीस यांना अजित पवार यांची सिंचन घोटाळ्याप्रकरणी चौकशी बंद होणार का असा प्रश्न विचारला होता. त्यावर त्यांनी जिथे गडबड आहे, अशी कोणतीही चौकशी बंद होणार नाही असे म्हटलं आहे. तर जाणीव पुर्वक ज्या राजकीय दृष्ट्या चौकशा होणार आहेत त्या होणार नाहीत असेही स्पष्टीकरण ही फडणवीस यांनी दिलं आहे. तर यावेळी नाना पटोले यांच्यावर निशाणा साधताना, त्यांना झटके येत असतात, त्यामुळे ते अशी टीका करतात असे ही फडणवीस म्हणाले.

 

 

Published on: Sep 17, 2022 06:02 PM
Politics of Maharashtra | राष्ट्रवादीकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं शुद्धीकरण-tv9
वेदांता प्रकल्प पळवून न्यायला महाराष्ट्र पाकिस्तान होता काय?; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना करारा जवाब