Nitesh Rane on Aaditya Thackeray | अयोध्येत वयाची मर्यादा आहे ना? राणेंचा आदित्य ठाकरेंना टोला

| Updated on: Jun 07, 2022 | 6:36 PM

आता दौऱ्यावरून भाजपने आदित्य ठाकरे यांची खिल्ली उडवायला सुरू केली आहे. आज भाजप आमदार नितेश राणे यांनी लहान मुलांना अयोध्यात परवानगी आहे का? असा सवाल केला आहे.

नाशिक : अयोध्याच्या दौऱ्यावरून सध्या राज्यात वादंग सुरू आहे. आधी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अयोध्या दौऱ्यावरून राजकारण तापवले त्याला भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी थंड करत राज ठाकरे यांनाच आवाहन दिले. ज्यामुळे राज ठाकरे यांना आपला दौरा रद्द करावा लागला होता. त्यानंतर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना देखील आपल्या दौऱ्याच्या तारखा या बदलाव्या लागत आहेत. त्यामुळे आधी शिवसेनेकडून मनसेला टार्गेट केले जात आहे. हा वाद सुरू असतानाच आता या वादात भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) उडी घेतली आहे. तसेच आपल्या नाशिकच्या दौऱ्यात त्यांनी हिंदुत्वावरून शिवसेनेवर सडकडून टीका केली आहे. तसेच लहान मुलांना अयोध्येत जाण्यास परवानगी आहे का? असा सवालही आमदार नितेश राणे यांनी केला.

Published on: Jun 07, 2022 06:36 PM
महाराष्ट्राच्या विकासासाठी भाजपविरोधात एकत्र येणं गरजेचं – किशोरी पेडणेकर
Nitesh Rane on Uddhav Thackeray | मुख्यमंत्री औषधही काँग्रेस आणि राष्ट्रवादीला विचारुन घेतात