महाराष्ट्राच्या हाती आवळा देऊन कोहळा काढण्याचाच हा प्रकार? सामनातून टीका

| Updated on: Jan 07, 2023 | 9:13 AM

अयोध्येत महाराष्ट्र भवनाची जागा देण्याचे मान्य करून योगींनी मुंबईतून 5 लाख कोटी नेले. म्हणजे महाराष्ट्राच्या हाती आवळा देऊन कोहळा काढण्याचाच हा प्रकार. महाराष्ट्राच्या विकासाकडे लक्ष द्यायला वेळ आहेच कुठे? असा सवाल ही उपस्थित केला आहे.

मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्यावरून सामनाच्या अग्रलेखात भाष्य करण्यात आली आहे. तसेच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या दौऱ्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धारेवर धरले आहे. तर महाराष्ट्राच्या विकासाकडे लक्ष द्यायला वेळ आहेच कुठे? असा सवाल ही उपस्थित केला आहे.

राऊत अग्रलेखात म्हणाले की, योगी गुंतवणूकदारांना लखनौला येण्यासाठी निमंत्रित करीत होते, तेव्हा आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे थुकरट राजकारण करत होते. ते शिवसेना फोडण्याचा आव आणीत होते. त्यावेळी उत्तर प्रदेश-बिहारचे राज्यकर्ते मुंबईत येऊन येथील गुंतवणुकीची लूट करीत आहेत.

अयोध्येत महाराष्ट्र भवनाची जागा देण्याचे मान्य करून योगींनी मुंबईतून 5 लाख कोटी नेले. म्हणजे महाराष्ट्राच्या हाती आवळा देऊन कोहळा काढण्याचाच हा प्रकार. पण सत्तेवर दुर्बळ, लाचार, बधिर सरकार असल्यावर दुसरे काय व्हायचे? मुख्यमंत्र्यांना फक्त चाळीस आमदारांच्या खोक्यांची काळजी लागल्याची टीका ही सामनातून केली आहे.

‘शाळिग्राम नावाच्या माकडाने दिवसापण गांजा…’; मिटकरींची तुषार भोसलेंवर खोचक टीका
राज्यातील १०० बातम्यांचा वेगवान आढावा; पहा काय सुरू आहे राज्यात