निवडणूकीच्या 4 महिन्यापुरता राम, राम करणे योग्य नाही, जितेंद्र आव्हाड यांची टीका

| Updated on: Dec 29, 2023 | 9:15 PM

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी लोकसभेच्या जागा वाटपाबाबत बैठकीत चर्चेतून मार्ग निघेल यासाठी प्रसारमाध्यमातून बोलून काही उपयोग नाही. प्रकाश आंबडेकर यांनी सोबत घ्यायलाच हवे याबाबत आपण तिन्ही पक्षांना विनंती करू असेही त्यांनी म्हटले आहे. भाजपाला केवळ निवडणूकीच्या चार महिन्यांपुरता राम, राम करायचे आहे अशीही टीकाही त्यांनी केली आहे.

ठाणे | 29 डिसेंबर 2023 : राम मंदिर कोणाच्या बापाची जायदाद आहे का ? पर्सनल प्रोपर्टी आहे का ? की त्यांनी आमंत्रण द्यायचे आणि सर्वांनी जायचे. निवडणूकीच्या चार महिन्यापुरते रामाला बाहेर काढून राम..राम करायचं योग्य नाही अशी टीका राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. चातुवर्ण्य व्यवस्था डॉ. बाबासाहेबांनी केव्हाच झुगारली आहे. यांच्या आमंत्रणावरुनच आम्ही मंदिरात जाऊ असं यांना वाटत असेल तर आमच्या बापांनी केव्हाच वाटा मोकळ्या केल्या आहेत. आम्ही आमच्या बापाच्या वाटेवरून जाऊ आम्हाला पाहीजे तेव्हा दर्शन घेऊन. दर्शन घेऊनच पण यांना विचारुन दर्शन घेणार नाही असेही आव्हाड यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत बसून चर्चेतून मार्ग निघेल. प्रकाश आंबेडकरांना सोबत घ्यावे अशी आपण तिन्ही पक्षांना विनंती करणार आहोत असेही त्यांनी म्हटले आहे. जागांचा प्रश्न असा प्रसारमाध्यमातून बोलून निघणार नाही असेही आव्हाड यांनी म्हटले आहे. जयंत पाटील केव्हाच राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शरद पवार यांना सोडणार नाहीत. आम्ही निष्ठा बदलणारी माणसे नाहीत संजय शिरसाठ यांनी चिंता करू नये असेही त्यांनी म्हटले आहे.

Published on: Dec 29, 2023 08:04 PM