‘त्यांची उतरती कळा, उतावळापणा करणे योग्य नाही,’ ठाकरे गटाच्या नेत्याची नेमकी टीका कुणावर?
नितेश राणे आपली जेवढी उंची आहे तेवढे तरी विचाराने वागा. शिवाजी महाराज यांची वाघनखें महाराष्ट्रात आली तर कोणाला अभिमान वाटणार नाही. त्याचे स्वागतच आहे. परंतु त्याची सत्यता तपासली पाहिजे.
मुंबई : 29 सप्टेंबर 2023 | उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर बैठक बोलावली होती. लोकसभा मतदारसंघाचा ते आढावा घेत आहेत. आम्ही आता इंडियामध्ये आहोत. इंडियामधून जी काही नावे ठरतील त्याची घोषणा लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर होईलच. भाजपला आता उतरती कळा लागली आहे. त्यामुळेच लोकसभेतून ते लोकांना खाली आणत आहेत अशी टीका ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केली. आदित्य ठाकरे गेले तेव्हा त्यांच्यासोबत उद्योगमंत्री देखील होते. त्यांनी संपूर्ण करार करून ठेवले होते. त्यामुळे आशिष शेलार यांनी काही बोलू नये असा टोला त्यांनी लगावला. मुख्यमंत्री कुठे गेले आणि 40 कोटी रुपये खर्च केले. त्या पैशाचे काय? गुजरात सगळे पळवत आहे आणि मुख्यमंत्री मान खाली येऊन बसलेले आहेत अशी टीका त्यांनी केली.
Published on: Sep 30, 2023 11:28 PM