Atul Londhe | बिनखात्याचे उपमुख्यमंत्रीच राज्य कारभार हाकतायेत, नोकरशाहीच्या हाती सत्ता देणे योग्य नाही, अतुल लोंढेंचे टीकास्त्र
Atul Londhe | कारभार नोकरशाहीच्या हाती सोपवणं योग्य नसल्याचे टीकास्त्र काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केले आहे.
Atul Londhe | राज्याचा कारभार नोकरशाहीच्या हाती सोपवणं योग्य नसल्याचे टीकास्त्र काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe)यांनी केले आहे. राज्याचे पहिले मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी सचिवालयाचे नाव मंत्रालय करण्यामागे हेच नेमके कारण होतं. लोकांना हे आपलं मंत्रालय वाटावं ते लोकाभिमूख असावं हा त्यामागील हेतू होता. लोकप्रतिनिधी हे लोकांमधून निवडून येतात. त्यामुळे त्यांचे निर्णय असावेत. ते सचिवांचे नसावेत हा त्यामागील हेतू होता. पण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शासन प्रशासनाची चाकं उलटी फिरवली आहे. बिनखात्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच राज्य कारभार चालवत आहेत तर मुख्यमंत्री त्यांच्यापुढे मान हालवत आहेत. बंड तर आपण करुन बसलो, पण भाजपने आपला केसांनी गळा कापला आहे. शिवसेना (Shiv Sena) संपवण्याच्या नादात अनेक चांगल्या लोकप्रतिनिधींची कारकीर्द संपवण्याचा हा प्रयत्न तर नाही ना अशा अनेक शंका उपस्थित होत आहेत, असेही ते म्हणाले.