Special Report : भाजपचं मिशन मुंबई! ठाकरे तुम्हारा हश्र क्या होगा? कोणी दिला हा इशारा? पाहा हा स्पेशल रिपोर्ट

| Updated on: Aug 02, 2023 | 9:23 AM

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्या दौऱ्यानंतर आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा हे 2 दिवसांसाठी मुंबई दौऱ्यावर आले होते. जे. पी नड्डा यांनी मुंबईमधील भाजपच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना अनेक सूचनाही दिल्या आहेत. यावेळी जे.पी नड्डा यांनी उद्धव ठाकरे यांना ललकारलं आहे.

मुंबई :  ‘मिशन मुंबई’साठी प्रत्येक पक्षाने कंबर कसली आहे. मुंबई महापालिकेमध्ये एकहाती सत्ता मिळवण्याठी भाजपने रणनिती आखायला सुरुवात केली. मुंबई महापालिकेवर आपलाच झेंडा फडकणार असा दावाही भाजपच्या नेत्यांकडून केला जात आहे. यासाठी भाजपने सक्रीय होत आपल्या पदाधीकाऱ्यांना कामाला लागण्याचे निर्देशही दिले आहेत. भाजपच्या रणनितीचा एक भाग म्हणून भाजपच्या बड्या नेत्याचा सध्या मुंबई दौरा होत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्या दौऱ्यानंतर आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा हे 2 दिवसांसाठी मुंबई दौऱ्यावर आले होते. जे. पी नड्डा यांनी मुंबईमधील भाजपच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना अनेक सूचनाही दिल्या आहेत. यावेळी जे.पी नड्डा यांनी उद्धव ठाकरे यांना ललकारलं आहे. ‘सबका हश्र क्या होगा? बडेगी तो सिर्फ भाजपा पार्टी’, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.  जे.पी नड्डा यांनी उद्धव ठाकरे यांना कोणता इशारा दिला? जे.पी नड्डा यांच्या मुंबई दौऱ्यामुळे भाजपला फायदा होणार की नाही? यासाठी  बघा यासंदर्भातील एक स्पेशल रिपोर्ट…

Published on: May 19, 2023 07:55 AM
Special Report | मुंबईत मविआचं जमलं तर लोकसभेच्या जागावाटपाचा तिढा कसा सुटणार?
खरा धोका त्र्यंबकेश्वराला धूप दाखविणाऱ्यांपासून नाही तर…, ‘सामना’तून भाजपवर जोरदार हल्लाबोल