स्वाभीमानाने लढणाऱ्या उद्धवजींचा अनुयायी होणार, भाजपा सोडणाऱ्या उन्मेष पाटील यांनी केले स्पष्ट

| Updated on: Apr 03, 2024 | 1:24 PM

जळगाव लोकसभा मतदार संघातून यंदा भाजपाने स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे जळगावचे भाजपाचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील नाराज होते. आज त्यांनी मतोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती

Follow us on

जळगावचे भाजपा खासदार उन्मेष पाटील यांनी अखेर भाजपाला सोडचिट्टी देत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत दाखल होण्याचा निर्णय घेतला आहे. आज त्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. मला उमेदवारी नाकारली म्हणून ही भूमिका घेतलेली नाही. राजकारणात, समाजकारणात कार्यकर्त्यांना मानसन्मान नको, पण त्याचा स्वाभीमान जर सांभाळला जात नसेल तो जर दुखावला जात असेल, अवहेलना केली जात असेल तर लाचार होऊन त्याठिकणी समाजकारण, राजकारण होऊ शकत नाही, सज्जनशक्ती पुढे आली पाहीजे, दुर्जनशक्ती पुढे आली तर आम्हाला बोलण्याचा अधिकार राहात नाही असे उन्मेष पाटील यांनी म्हटले आहे. आपल्याला सकारात्मक राजकारण करायचे आहे, त्यामुळे आपण स्वाभीमानाने लढणाऱ्या उद्धव ठाकरे यांचा अनुयायी होणार असल्याचे उन्मेष पाटील मातोश्रीत दाखल होण्यापूर्वी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटले आहे. भाजपाने जळगावमधून सिटींग खासदार उन्मेष पाटील यांना तिकीट न देता स्मिता वाघ यांना यंदा लोकसभेचे तिकीट दिले आहे. त्यामुळे उन्मेष पाटील नाराज झाले होते. त्यामुळे त्यांनी अखेर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपाला मोठा धक्का बसल्याचे म्हटले जात आहे.