शिंदेगटाला सोबत घेतल्यामुळे भाजपचं रेटिंग घसरलंय!; राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याचं वक्तव्य

| Updated on: Mar 29, 2023 | 7:54 AM

Jayant Patil on CM Eknath Shinde : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप आणि शिंदेगटावर टीका केली आहे. जयंत पाटील यांनी जळगावात भाजप आणि शिंदे गटाला लक्ष्य केलंय. पाहा व्हीडिओ...

जळगाव : शिवसेना आणि भाजप युतीवर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याने भाष्य केलंय. “शिंदेगटाला सोबत घेतल्यामुळे भाजपचं रेटिंग घसरलंय”, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. भाजपला राज्यातली जनताच त्यांची जागा दाखवेल. शिवसेनेच्या बाबतीत बोलायचं झालं तर शिंदेगटाला आणि उद्धव ठाकरेंना जनतेचा किती पाठिंबा आहे हे मालेगावच्या सभेत दिसून आलंय. शिंदे गट भाजपसोबत गेल्यामुळे शिंदे गटाचं तर रेटिंग कमीच आहे. पण असंगाशी संग केल्यामुळे भाजपचं पण रेटिंग लोकप्रियता घसरली आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे. ते जळगावमध्ये बोलत होते.

Published on: Mar 29, 2023 07:48 AM
50 आमदार ठाकरेंना कंटाळले होते; भाजप नेत्याचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
राहुल गांधी यांना बेघर केले, तुमचाही नेत्यानाहू होईल!; सामनातून नरेंद्र मोदींवर निशाणा