Jalgaon News : जळगावात दोन गटात तूफान राडा

| Updated on: Mar 17, 2025 | 7:22 PM

Jalgaon Crime News : जळगावमध्ये एका आरोपीमुळे 2 गटात राडा झाला असल्याचं बघायला मिळालं आहे. पोलिसांनी मध्यस्थी केल्याने हे प्रकरण निवळलं आहे.

जळगावमध्ये एका आरोपीला कोर्टात हजर केल्यानंतर दोन गटात वाद झाला आहे. यावेळी दोन गट समोरासमोर आल्यानंतर तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर दोन्ही गटातील वाद निवळला. अटक केलेल्या आरोपीला जामीन मिळण्याची अफवा पसरल्यानंतर काही तरुण जळगाव जिल्हा न्यायालयात जमले होते. काल एका आरोपीला पोलिसांनी अटक केली होती. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार होतं. तत्पूर्वी सोशल मिडियावर या आरोपीला आज जामीन मिळेल, अशी अफवा पसरवण्यात आली होती. त्यामुळे हा वाद पेटला. मात्र पोलिसांच्या मध्यस्थीने वातावरण शांत झालं. दरम्यान, या आरोपीला न्यायालयाने 3 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Published on: Mar 17, 2025 07:21 PM
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख