Video | आदित्य ठाकरे फक्त इस्टेटीचे वारसदार, विचारांचे नव्हे, शिंदे गटाच्या नेत्याकडून पुन्हा टार्गेट!
खडसेंच्या राजकीय स्थितीवर बोट ठेवत गुलाबराव पाटील म्हणाले, ' एकनाथ खडसे यांना जिल्ह्यात कुणी विचारत नाही, एकनाथ शिंदे मागच्या दरवाजाने आमदार झाले त्यांना त्यांच्याच जिल्ह्यात कोणी विचारत नाही त्यांच्याबद्दल जास्त बोलणे योग्य नाही...
दत्ता कनवटे, जळगावः आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचं नाव फक्त ठाकरे असल्यामुळे त्यांना महत्त्व आहे. त्यांना आमदार करण्यासाठी दोन आमदार द्यावे लागले, अशी खरमरीत टीका जळगावचे शिंदे गटातील आमदार आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केली आहे. एवढंच नाही तर आदित्य ठाकरे हे केवळ इस्टेटीचे वारसदार आहेत. विचारांचे वारसदार आम्ही आहोत, असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी थेट निशाणा साधला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath khadse) यांच्या मुक्ताईनगरमध्ये आज मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांची जंगी सभा होत आहे. यानिमित्त जळगावचे आमदार गुलाबदाव पाटील यांनी मोठी तयारी केली आहे. सभेपूर्वी टीव्ही 9 ला दिलेल्या प्रतिक्रियेत पाटील यांनी शिवसेना आणि खडसेंवर टीकास्र सोडले.
चंद्रकांत खैरेंवर टीका करताना गुलाबराव पाटील म्हणाले, खैरे माझ्या गळ्यापर्यंत काय माझ्या नाखापर्यंत पोचू शकत नाहीत. पण माझं तोंड सुटलं तर आवरणे कठीण होईल….
खडसेंच्या राजकीय स्थितीवर बोट ठेवत गुलाबराव पाटील म्हणाले, ‘ एकनाथ खडसे यांना जिल्ह्यात कुणी विचारत नाही, एकनाथ शिंदे मागच्या दरवाजाने आमदार झाले त्यांना त्यांच्याच जिल्ह्यात कोणी विचारत नाही त्यांच्याबद्दल जास्त बोलणे योग्य नाही…
आमच्या रेल्वेला चांगला ड्रॉइव्हर मिळाला आहे. आमचे ड्रॉइव्हर सुसाट वेगाने निघाले आहेत. आमची understanding चांगली आहे. आमच्यात कुणी भांडणे लावत असले तरी ते शक्य होणार नाही…असंही पाटलांनी स्पष्ट केलं.