जळगावात दोन्ही मंत्र्यांची मध्यस्थी; अखेर नगरसेवकांचं आंदोलन मागे; आयुक्तांनाही मंत्र्याकडून समज

| Updated on: Aug 01, 2023 | 9:19 AM

जळगाव शहरातील विविध समस्या, त्याचप्रमाणे नगरसेवकांच्या कामांचे वाटप, बिलांची अदायगी अशा विषयांसंदर्भात आयुक्तांना योग्य त्या सूचना केलेल्या आहेत. नगरसेवकांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन त्या तातडीने सोडविण्याच्या सूचना आयुक्तांना केल्याचेही गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितले.

जळगाव, 01 ऑगस्ट 2023 | जळगाव महापालिकेच्या आयुक्तांवर अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याच्या मागणीसाठी एकत्र आलेल्या सर्वपक्षीय नगरसेवकांनी आपली तलवार म्यान केलीय. पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मध्यस्थी केल्यानंतर नगरसेवकांना आपला आक्रमक पवित्र मागे घेतला. आयुक्त विद्या गायकवाड यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात येणार नसल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिलीय. जळगाव शहरातील विविध समस्या, त्याचप्रमाणे नगरसेवकांच्या कामांचे वाटप, बिलांची अदायगी अशा विषयांसंदर्भात आयुक्तांना योग्य त्या सूचना केलेल्या आहेत. नगरसेवकांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन त्या तातडीने सोडविण्याच्या सूचना आयुक्तांना केल्याचेही गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितले. दरम्यान दोन्ही मंत्र्यांनी या प्रकरणात मध्यस्थी केल्याने सर्वपक्षीय नगरसेवकांना आपला आक्रमक पवित्रा मागे घेतला आहे.

Published on: Aug 01, 2023 09:19 AM
Cabinet Expansion | राज्यसरकारचा तिसरा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच; पालकमंत्री पदाबाबत ही मोठी घोषणा
पंतप्रधान मोदी-शरद पवार एकाच मंचावर, “देवा, दगडूशेठ गणराया, तूच…”; सामनातून निशाणा