काही दगड सोनं म्हणून आमच्याकडे होते, पण ते दगडच निघाले; राऊतांचा कोणावर घणाघात

| Updated on: Apr 23, 2023 | 11:04 AM

राऊत यांनी पाटील यांच्यावर टीका करताना, जळगाव ही सुवर्ण नगरी आहे. येथील काही दगड सोनं म्हणून आमच्याकडे होते, पण ते दगडच निघाले, आता काय करणार, असं म्हटलं आहे.

जळगाव : जळगावातील पाचोऱ्यात आज ठाकरे गटाची सभा होणार आहे. मात्र, या सभेपूर्वी खासदार संजय राऊत यांनी जळगावचे पालकमंत्री तथा शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राऊत यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर टीका करताना ते दगड असल्याचे म्हटलं आहे. राऊत यांनी पाटील यांच्यावर टीका करताना, जळगाव ही सुवर्ण नगरी आहे. येथील काही दगड सोनं म्हणून आमच्याकडे होते, पण ते दगडच निघाले, आता काय करणार असं म्हटलं आहे. आम्ही त्यांचा आजच्या सभेत भांडा फोड करू ही त्यांच्या मनामध्ये ती भीती असल्यानेच आम्हाला धमक्या देत आहेत. असा घणाघात राऊत यांनी केली आहे.

Published on: Apr 23, 2023 11:04 AM
खासगी ट्रॅव्हल्स बसच्या अपघातस्थळाची खासदार सुळेंची पाहणी
राज ठाकरे यांची रत्नागिरीची सभा म्हणजे पिकनिक, कुणी लगावला खोचक टोला?