पन्नास खोके घेऊन महिलांना एसटीमध्ये 50% आरक्षण दिलं, पण रिक्षावाल्यांचं काय?; राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याचा सवाल
मी विधिमंडळ अधिवेशनात शेतकऱ्यांचा मुद्दा लावून धरला. फक्त एकनाथ खडसे हाच शेतकऱ्याचा पोरगा आहे का?, असं म्हणत एकनाथ खडसे यांनी टीका केली आहे.
रावेर, जळगाव : राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते, विधानपरिषद आमदार एकनाथ खडसे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. तुम्ही पन्नास खोके घेऊन एसटी मध्ये 50% आरक्षण दिलं मात्र काली-पिली रिक्षावाल्यांचं काय?, असा सवाल एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला आहे. शेतकऱ्याच्या कोणत्याच मालाला भाव नाही. कापसालाही सध्या भाव नाही. खताचे भाव वाढले शेतकरी हैराण आहे. या सरकारला विशेषता भाजपला याच्याशी काहीही घेणं देणं राहिलेलं नाही, असं म्हणत एकनाथ खडसे यांनी टीका केली आहे. कापसाला भाव मिळाला पाहिजे यासाठी एकाही आमदाराने विधानसभेत आवाज उठवला नाही, असं एकनाथ खडसेंनी रावेरमधल्या एका कार्यक्रमात म्हटलं आहे.
Published on: Apr 01, 2023 09:33 AM