चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणतात त्याला मी महत्त्व देत नाही; मंत्री गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य

| Updated on: Apr 04, 2023 | 8:42 AM

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत महत्वाचं वक्तव्य केलं आहे. ते नेमकं काय म्हणालेत? पाहा...

जळगाव : राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत महत्वाचं वक्तव्य केलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले त्याला मी महत्त्व देत नाही. कारण तो त्यांचा स्पेसिफिक विचार आहे. ते भाजपचे नेते आहेत. आम्ही फक्त जी प्रॉपर युती होती, त्या युतीबरोबर जाण्याचा प्रयत्न केलाय, असं गुलाबराव पाटील म्हणालेत. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विश्वासघाताचा बदला घेतला या वक्तव्यावर गुलाबराव पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी हे उत्तर दिलंय. ते जळगावमध्ये बोलत होते.

Published on: Apr 04, 2023 08:41 AM
छत्रपती संभाजीनगरच्या दंगलीमागे पीएफआयचा हात? भाजप खासदारच्या वक्तव्याने चर्चा
राम शिंदे यांची महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेवर टीका; म्हणाले…