होय मी गद्दारी केली!, फक्त ‘या’ कारणासाठी; मंत्री गुलाबराव पाटील यांचं मोठं वक्तव्य
एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी उद्धव ठाकरेंशी गद्दारी केली, असा आरोप ठाकरेगटाकडून वारंवार करण्यात येतो. ठाकरेगटाची ही टीका पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मान्य केली आहे. पाहा ते काय म्हणालेत...
जळगाव : एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी उद्धव ठाकरेंशी गद्दारी केली, असा आरोप ठाकरेगटाकडून वारंवार करण्यात येतो. ठाकरेगटाची ही टीका पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मान्य केली आहे. “एक मराठा चेहरा आमच्या शिवसेनेतून बाहेर गेला. त्याला मुख्यमंत्री करण्यासाठी मी गद्दारी केली”, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. “विरोधक टीका करतात, त्यांना माझा चॅलेंज आहे, शरद पवार… मग एकनाथ शिंदे कोण आहेत? ते पण मराठा आहेत. आम्ही मराठा मुख्यमंत्री केला. मी मेंटल आहे का?”, असं गुलाबराव पाटील म्हणालेत.
Published on: Feb 25, 2023 10:29 AM